नगरपंचायतने दिवाळी सणा पूर्वी छ.शिवाजी महाराज चौक ते डॉ.आंबेडकर चौक रस्त्यावरील पोलवर विद्युत दिवे बसवावे - उमर चाऊस


 

पाटोदा : गणेश शेवाळे

 देशातील सर्वात मोठा सण दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पाटोदा शहराच्या प्रमुख बाजारपेठे मध्ये सर्वत्र अंधारच अंधार असतो त्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री शहरातील सर्वात मोठी व्यापार पेठ असल्याने चोऱ्याही होऊ शकतात तसेच दिवाळी सणा निमित्त लोक खरेदी साठी बाहेर निघतात बाहेर गावावरून ही नागरिक येतात. मात्र शहरातील मुख्य बाजार पेठेत अंधार असल्यामुळे आपघात होऊ शकतात यामुळे तात्काळ पाटोदा नगरपंचायतने शहरातील प्रमुख बाजार पेठ असलेल्या छञपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावरील विद्युत पोल वर तात्काळ विद्युत दिवे बसवावे नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करु असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवानेते उमर चाऊस यांनी दिला आहे.

टिप्पण्या