संजय कोठारी यांनी मदत केल्यामुळे एकाचे प्राण वाचले


 

पाटोदा : शिव जागृती न्यूज


सौताडा घाटामध्ये रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असुन घटनेची माहिती पत्रकार संजय सानप , अण्णा टेकाळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली ,कोठारी यांनी ताबडतोब 108 ला फोन करून घटनास्थळी ऍम्ब्युलन्स पाठवली सदर अपघातामध्ये संजय बाबासाहेब भुसारे शेवगाव जिल्हा अहमदनगर हे हिरो होंडा डि ओ एम एच 0 2 /0929 मुंबईवरून आपली सासरवाडी धनगर जवळका तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे जात असताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गाडीवरून उडून खड्ड्यात पडले. सदर व्यक्तीच्या डोक्याला मार लागला असून, त्यांच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झाला. त्यांना ताबडतोब जामखेड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.यावेळी महेश मोहळकर ,युवराज भोसले, राजेंद्र कोहक ,विनोद धुमाळ, जालिंदर जाधव ,कैलास पवार ,अजिनाथ शिरसाठ, सागर फुंदे आदींनी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिली असता त्यांचे मेहुणे हे त्यांना नेण्यास आले,आणि ते घेऊन गेले.


==================================


मी बऱ्याच वेळा उपअभियंता दिलीप तारडे ,अहमदनगर आणि उपअभियंता राजेंद्र भोपाळे ,बीड यांच्याशी रोड बाबत संपर्कात असून रोडचे काम करण्यास बोललेलो आहे परंतु अद्याप या कडे विशेष लक्ष दिले जात नाही

 ओ .......साहेब.... माणसं मेल्यावर तुम्ही खड्डे बुझवनार का?

संजय कोठारी,सामाजिक कार्यकर्ते जामखेड

टिप्पण्या