पाटोदा *(गणेश शेवाळे)* मध्यप्रदेश सरकारने आपल्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करत मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केली असून त्यांना केलेली अटक ही लोकशाहीची हत्या असून मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या वरील सर्व बिनबुडाचे आरोप मागे घेऊन त्यांची बिनशर्त सुटका करावी,महिला मुलीवर वाढते अत्याचार रोखावेत तर मंहत गुरुच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावे या मागणीचे पाटोदेकराच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात शुक्रवार दि.1/ ऑक्टोंबर रोजी उपविभागीय कार्याला मार्फत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व पोलीस अधिक्षक बीड यांना देण्यात आले पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की उत्तर प्रदेश मध्ये निवडणुका जवळ आलेल्या असून हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी जाणून बुजून मौलाना कलीम सिद्दीकी यांचा कोणताही गुन्हा नसतांनात्यांना ए टी एस मार्फत अटक केली आहे. त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून हे सर्व आरोप मागे घेत लवकरात लवकर त्यांची सुटका करण्यात यावी.कारण देशात लोकशाही असून ज्याला त्याला आपल्या धर्माचा प्रसार प्रचार करण्याचे अधिकार दिलेले आहे मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक म्हणजे भारतीय मुसलमाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून हा लोकशाही ला घातक आहे.यामुळे सामाजिक न्याय मंत्री यांनी लक्ष घालून त्यांच्या सुटके साठी प्रयत्न करावेत आशे उपविभागीय कार्यालया मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना पाटोदा तालुक्यातील शेकडो युवक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा