पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हा - राहुल बामदळे


 


पाटोदा: शिव जागृती न्यूज

"आपकी बार महंगाई पर वार" हे ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभरात केंद्र सरकारच्या विरोधामध्ये 20th ऑक्टोबर 2021 रोजी पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आव्हान केले आहे या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी बीड जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस राहुल बामदळे यांनी केले आहे.

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ महागाई कमी व्हायचं नाव घ्यायला तयार नाही हेच केंद्र शासनाला सांगण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभं करण्यात येणार आहे केंद्र सरकारला त्याची जाणीव करून देण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभर निदर्शन करण्यात येणार आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र शासनाला लक्षात आणून देण्यासाठी व महागाई कमी करण्यासाठी निदर्शने करण्यात येणार आहेत यासाठी युवकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान राष्ट्रवादी युवक कांग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस राहुल बामदळे यांनी केले आहे.

टिप्पण्या