➡️ पाटोदा तालुक्यातील लाभार्थ्याच्या खात्यात 2 कोटी 11 लक्ष 27 हजार 600 रु. जमा - भुषण जाधव
पाटोदा: शिव जागृती न्यूज
श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्यातील निराधार,अपंग, वयोवृद्ध, विधवा महिला व गोरगरिबांसाठी सुरू असलेल्या या योजनेतील मानधन मागील ३ महिन्यांपासून रखडले होते मात्र ऐन सणासुदीच्या काळात राज्य सरकारने पाटोदा तालुक्यातील 13751 लाभार्थ्याच्या 2 कोटी 11 लक्ष 27 हजार रुपये मानधन वितरित करण्यात आले आहे.
सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून महाविकास आघाडी सरकार व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मुळे सर्वसामान्य संजय गांधी,श्रावणबाळ, दिव्यांग बांधवाची दिवाळी गोड होणार असल्याने पाटोदा तालुका संजय गांधी, श्रावण बाळ समितीचे अध्यक्ष भूषण जाधव यांनी आभार मानले असून पाटोदा तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ, विधवा,निराधार योजनेत 2 कोटी 11 लक्ष 27 हजार 600 रुपये निधी देऊन राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड साजरी केली असून दिवाळी निमित्त संजय गांधी श्रावणबाळ समितीचे अध्यक्ष भूषण जाधव यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा