पाटोदा *(गणेश शेवाळे )* वन परिक्षेत्र आष्टी अंतर्गत सौताडा येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम दि १ ऑक्टोंबर रोजी जि.प .मा.शा. सौताडा येथे पार पडला .कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डी.बी चौरे(वनपाल) बी.पी यादव (वनरक्षक )हे होते .वनसंरक्षक बी पी यादव यांनी वन्यजीव सप्ताह निमित्त विस्तृतपणे मार्गदर्शन केले. वन्यजीवापासुन संरक्षण करायच असेल तर रात्री बाहेर पडताना हातात प्रकाश दिवा ,काठी असावी ,बीबट्या दृष्टीस पडल्यास दिसल्यास वाट बदलवी ,मोठ्याने आवाज काढावेत , बचावासाठी मानेला मफलर गुंडाळावी पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण घनवृक्षलागवड तसेच रोप निर्मिती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत वनरक्षक यादव यांनी व्यक्त केले.वाढत्या प्रदुषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर कमी होत आहे .ओझोनची पातळी वाढवण्यासाठी झाडे लावुन ते जगवणे हे विसाव्या शतकातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे .शालेय जीवनात वृक्षारोपणाविषयी विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी वन्यजीव सप्ताह कार्यक्रम आयोजित केले जातात .
सौताडा वनविभाग हा बीड जिल्ह्यातील वनीकरण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण , घनवृक्षलागवड ,तसेच रोप निर्मिती करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर आहे 2013/14 साली राज्याचे मुख्य सचिव वनविभागज्ञ प्रविणसिंह परदेशी यांनी भेट दिली होती व येथील वनपाल , वनसंरक्षक , वनमजुर यांच्या कामाबद्दल कौतुक केले होते .सौताडा विभागातील वनमजुर ,भाऊसाहेब पेचे,नवनाथ उबाळे हे रोपवन , घनवृक्षलागवड, रोपनिर्मिती करणे तसेच रोपांची वाढ , पाणीपुरवठा ,रोपांची काळजी उत्तमरित्या घेतात .एकदा लावलेली रोपे ही चांगल्याप्रकारे जतन केली जातात ....या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिसाळ सर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी बबन नागरगोजे,सरपंच पती नवनाथ सानप , उपसरपंच परसराम गायकवाड ,ग्रा. प ,सदस्य अशोक सानप ,शाळेचे मुख्याध्यापक गणेश बेदरे ,जावळे सर ,रानमारे सर ,जायभाय सर ,लाड सर ,आव्हाड तसेच माध्यमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा