पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील पत्रकार श्रीरंग लांडगे यांचे वडील मोरेश्वर भिमराव लांडगे (वय वर्ष ८० )
यांचे दि.५ मंगळवार रोजी रात्री दु:खद निधन झाले आहे. वैधकिन्ही पंचक्रोशीतील ते देवा नावाने प्रसिद्ध होते.अध्यात्म व सामाजिक क्षेत्रात भरीव काम होते, सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. भुमिगत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकासाठी घरोघरी भाकरी गोळा करून दऱ्याखोऱ्यात पुरविण्याचे काम केलेले आहे. उर्दु, पाली,व इंग्रजी भाषावर प्रभुत्व होते. अलीकडच्या काळात अनेक उर्दू पत्रे व लिखाण भाषांतर करुन देत असत.
त्यांचा अंत्यविधी बुधवार दि. ६ रोजी वैद्यकिन्ही येथे सकाळी११:३० वा.करण्यात आला. यावेळी ह.भ.प. रामकृष्ण ( बापु ) रंधवे महाराज, ,ह.भ.प.बाबा महाराज शिंदे,ह.भ.प. आर्जुन महाराज शिंदे, ह.भ.प.सत्यभामाताई बांगर,
किरण बांगर, सरपंच अतुल मकाळ, यांनी श्रध्दांजली अर्पण केली. अंत्यविधीस त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यासह राजकीय, सामाजीक, अध्यात्मिक, पत्रकार , वैद्यकिन्ही व परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
लांडगे परिवाराच्या दु:खात शिव जागृती न्यूज परीवार सहभागी आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा