पाटोदा : शिव जागृती न्यूज
शासन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नवनवीन योजना आणत आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने बी-बियाणे वाटप योजना आणली होती. महाडीबीटी पोर्टल द्वारे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते.बी बियाणे वाटप या योजनेमध्ये शासनाने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या निवडी एक महिन्यापूर्वीच केलेल्या आहेत, शेतकऱ्यांना याचे मेसेजही आले आहेत व आपले बियाणे कृषी ऑफिस वरून घेऊन जावे अशा प्रकारचे मेसेज आले आहेत परंतु संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते आम्हाला काही माहीत नाही अशी उत्तरे देत आहेत.
पेरणीची वेळ निघून जाऊ लागली आहे तरीही अद्याप पर्यंत शासनाने बियाणे उपलब्ध करून दिले नाही.पेरणी झाल्यानंतर बियाणे उपलब्ध केले तर त्याचा काय उपयोग.? असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे कृषी विभागात कोणत्याही योजनांची अंमलबजावणी करणे म्हणजे "वरातीमागून घोडे मिरवणे" असाच प्रकार घडत आहे.संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनाचे शासनाचे अजिबात लक्ष नाही असे दिसते आहे. आ. आजबे काका व आ. धस यांनी यामध्ये लक्ष घालावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याविषयी विचारणा करण्यासाठी कृषी अधिकारी सोनवणे यांना संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा