शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली, सौताड्यात दोन जखमी


 


पाटोदा : शिव जागृती न्यूज


 

पाटोदा तालुक्यात सौताडा येथे  शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली , दोन जखमी झाल्याची घटना घडली. पावसादरम्याना विजांचा कडकडाट सुरु झाला. यावेळी शेतात काम करणाऱ्या कुणालाही कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत काय होईल. पाऊस सुरु असताना अचानक जवळ वीज कोसळली. यामध्ये

स्वाती शरद शिंदे   वय (23 ) आशाबाई शिवाजी शिंदे  वय ( 35) या दोन महिला जखमी झाल्या असुन  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित घटना ही पाटोदा  तालुक्यातील सौताडा येथे 

दि 8 / 10 / 2021 रोजी  शिवारात  घडली आहे पाटोदा तालुक्यात काल पासून संततधार सुरु होती. पण या पावसादरम्यान कोणतीही अनपेक्षित घटना घडेल, असा कुणालाही अंदाज नव्हता. त्यामुळे सौताडा  गावातील गावकरी आपल्या नेहमीच्या नित्यनियमाप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. शेतात शेतमजूरही काम करत होते. शेतात काम सुरु असाताना पावसाची संततधार सुरु होती आणि अचानक झालेल्या प्रकारा मुळे  यावेळी परिसरात खळबळ उडाली. महसूल प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

टिप्पण्या