स्वातंत्र्यलढा आणि महात्मा गांधी


 

  भारतीय स्वातंत्र्याचा लढा म्हटलं की गांधीजी हे नाव अग्रस्थानी येतेच.

1920 ते 1947 हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो.1920 पासून काँग्रेसची धुरा गांधीजींच्या हाती आली होती.

  2 ऑक्टोबर 1869 रोजी वडील मोहनदास व माता पुतळाबाई यांच्या पोटी पोरबंदर गुजरात या ठिकाणी गांधीजींचा जन्म झाला. गांधीजींनी वयाचे 21 वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये काढली. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन या शहरात वकिली करत होते. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या प्रश्नांना वाचा फोडून तिथल्या भरतीयांना जे अधिकार नाकारण्यात येत होते त्या विरुद्ध तेथील भारतीय जनतेला एकत्र करण्याच काम महात्मा गांधीजींनी केलेले आहे.

 1894 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली. तिथल्या भारतीयांना संघटित केल्या नंतर 1915 मध्ये गांधीजी परत भरतात आले. त्यावेळी भारतीयांना हि इंग्रजांच्या जाचाला सामोरे जावे लागत असे. या मध्ये शेतकऱ्यांकडून जबरदस्ती कर वसुली करणे, सक्तीने विविध पिके घ्यायला सांगितले जात असे त्याचा योग्य मोबदला हि शेतकऱ्यांना दिला जात नव्हता. या जाचा विरुद्ध गांधीजी बिहार मधील चंपारण्य येथील निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

  त्याप्रमाणेच सन 1918 साली गुजरात मध्ये देखील दुष्काळ पडला असता शेतकऱ्यांकडून सक्तीने कर वसुल केला जात होता. गुजरात मधील खेडा या गावी महात्मा गांधीजींनी सत्याग्रह करून इंग्रजांना शेतजऱ्यांची बाजू पटवून दिली होती.

  एकंदरीत विचार केला तर महात्मा गांधीजींनी इथल्या शेतकऱ्यांसाठी केलेले सत्याग्रह व उठाव हे आजही आदर्श ठरत आहेत. फक्त शेतकरीच नव्हे तर संपूर्ण जनताच इंग्रजांच्या जाचाला कंटाळली होती.

  रौलेट कायद्याविरुद्ध पंजाब मधील जालीयनवाला बाग येथे मोठया प्रमाणात निदर्शने होऊ लागली. परंतु इंग्रज अधिकारी जनरल डायरने या जमवावर गोळीबार केला. या जमावातील गोलोबारात सेकडो लोक मारली गेली. ही घटना 13 एप्रिल 1919 रोजी जालीयवाला बाग या ठिकाणी घडली घटना.

 या घटनेचा निषेध म्हणून गांधीजींनी 1920 रोजी असहकार चळवळ सुरु केली. परंतु पुढे 1922 मध्ये चौरीचोरा प्रकरणानंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली.पुढच्या काही काळ गांधीजी हे राजकारणापासून दूर राहिले होते. परंतु परिस्थितीचा विचार करून 1928 मध्ये गांधीजी पुन्हा राजकारणात सक्रिय झाले.1928 मध्ये कोलकत्ता येथील काँग्रेस च्या अधिवेशनात भारताला सार्वोभौम दर्जा देण्यात यावा ही मागणी केली. ही मागणी मान्य केली नाहीतर पुन्हा असहकार चळवळ सुरु करू अस गांधीजींनी इंग्रजांना दम दिला होता.

 महात्मा गांधी बरोबर अनेक क्रांतिकारक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते. या मध्ये सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल या सारखे अनेक नेते सहभागी होते. सुभाष चंद्र बोस यांनीच महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. देश स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारे महात्मा गांधी हे महान नेते ठरतात. म्हणूनच गांधीजींना महात्मा म्हनुण देखील संबोधण्यात येते. अश्या या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त त्यांना विन्रम अभिवादन.


साभार :- परमेश्वर बनकर, बीड 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा