योगेश सानप यांच्या वतीने ऊसतोड कामगार नोंदणी अभियान जनजागृतीस पाटोदात सुरुवात


 

पाटोदा :गणेश शेवाळे

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आ सुरेश धस यांच्या ऊसतोड कामगारांची शासन दरबारी नोंद व्हावी या मागणीला यश आलेले असून शासनाकडून ओळखपत्र देण्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. 

   या अनुषंगाने याबाबत सर्व ऊसतोड कामगारांना माहिती व्हावी, कामगारांनी योग्य माहितीसह सर्व फॉर्म व्यवस्थित भरून शासनाच्या प्रतिनिधीकडे जमा करावा यासाठी आ सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे नेते योगेश सानप यांनी मोफत फॉर्म वाटपासह जनजागृती अभियानाची सुरुवात केली आहे.

पाटोदा तालुक्यात मोफत फॉर्म वाटप व मार्गदर्शन, जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी आमदार सुरेश धस नोंदणी रथ तयार करण्यात आलेला असून आ सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगाव जाऊन याबाबत मार्गदर्शन,फॉर्म वाटप व याबाबत ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे युवा नेते योगेश सानप यांनी म्हटले.

आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने संयोजक योगेश सानप यांच्या वतीने पाटोदा येथे उसतोड कामगार नोंदणी अभियानच्या रथाचे उदघाटन आज लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार संघटनेचे प्रवक्ते अभिजीत शेेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुरेश धस मिञ मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

टिप्पण्या