निराधारांचे रखडलेले मानधन दिवाळीपूर्वी जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार

 

पाटोदा: शिव जागृती न्यूज

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना गत पाच ते सहा महिन्यांपासून मानधन देण्यात आले नसल्यामुळे त्यांच्यावर ऐन सना सुदीच्या काळात उपासमारीची - वेळ आली असल्यामुळे दिव्यांग संघर्ष समीतीचे अध्यक्ष शेख जीलानी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील शेकडो निराधारांचे रखडलेले मानधन दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अन्यथा पाटोदा तहसील समोर जन आक्रोश मोर्चा काढत तिव्र ते अति तिव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करणार असल्याचे जीलानी शेख, संतोष कोकाटे,शेख आलमभाई,उमेश धस,अशोकदगडखैर,संतोष राख, दत्ता कदम, बजरंग लांडगे ,वैभव देशमुख, अनिता नेहराळे, राधा आरसुळ,ताई पाटोळे,निकेश सरोदे, ईश्वर आमटे, ईश्वर माने, सह सर्व दिव्यांग बांधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पण्या