अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकट पन्नास हजार रुपये दया - गणेश कवडे
पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांच्या आलेला पिकांची पुर्णपणे नासाडी झाली असुन पेरणीचा खर्च ही शेतकऱ्यांचा निघालेला नाही पाऊस आजपर्यंत बंद झालेला नाही तरी शासनाने पंचनामे किंवा ई.पिक पाहणी चा घाट न घालता सरसकट शेतकऱ्यांना एकरी 50,000 / - रुपये नुकसान भरपाई दयावी .
उत्तर प्रदेश लखमीपुर खीरी येथे शेतकरी आंदोलन करत असताना उत्तर प्रदेशचे गृहमंत्री यांच्या मुलाने वहान घालुन पाच शेतकरी चिरुडून मारले ही बाब लोकशाहीत गंभीर आहे तात्काळ संबधीत गुन्हेगारास अटक करुन योग्य शिक्षा देण्यात यावी व मयत शेतकऱ्यांच्या कुटूबाला आर्थिक मदत देण्यात यावी .
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव मा.महोदया , प्रियंका गांधी या उत्तर प्रदेश येथील लखमीपुर खीरी येथील आंदोलनात चिरडून मारलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवुन अटक करण्यात आली ही बाब लोकशाहीच्या विरुध्दात असुन उत्तर प्रदेश येथील सरकार हुकूमशाही , हिटलरशाही असल्याचे दिसुन येत आहे या गंभीर बाबीचा जाहिर निषेध करण्यात येत आहे असे उपविभागीय अधिकारी पाटोदा यांना दिलेल्या निवेदणात राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश कवडे, उमर चाऊस, राजाभाऊ देशमुख,देविदास काळे, योगेश ढवळे, पोपट काळे, अभिमान नागरगोजे, महादेव काळे, हरीभाऊ नाईकनवरे, आण्णा राऊत, अजय नारायणकर, बापु नवले पाटील, व शेतकरी यांनी म्हटले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा