पाटोदा :गणेश शेवाळे
केंद्र सरकारने बनवलेल्या राक्षसी कृषी कायद्यांना पहिल्या दिवसा पासूनच प्रखर विरोध केलेला आहे. आपण देशातले सर्व आंदोलनकर्ते शेतकरी व संघटनांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत.पाटोदा तालुक्यातील शिवसेने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी ही लखिमपुर खेरी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने अंगावर गाडी घातल्यामुळे शहीद व जखमी झालेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी तसेच भाजपा सरकारने पास केलेले शेतकरी विरोधी राक्षसी कायदे मागे घ्यावेत यासाठी येत्या सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या "महाराष्ट्र बंद" ला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी पाटोदा तालुका शिवसेना पक्ष सहभागी होणार असून तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी संविधनिक मार्गाने या महाराष्ट्र बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आशे आवाहन पाटोदा तालुका शिवसेना प्रमुख राहुल चौरे यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा