डोंगरकिन्ही तील भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता अरुण येवले राष्ट्रवादीत


 

पाटोदा : शिव जागृती न्यूज


भारतीय जनता पार्टीत गेली वीस वर्ष काम करत असताना ता सरचिटणीस,शक्तिकेंद्र प्रमुख, गट प्रमुख अशा अनेक पदावर काम करून पार्टीची ताकद वाढवली.पण पक्षात शिस्त राहिली नाही.त्यात मान मिळत नाही. त्यामुळे त्यांनी आ बाळासाहेब आजबे काका यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यांच्या सोबत ग्रा प सदस्य अशोक वाल्हेकर.अतुल दळवी.यांनीही प्रवेश केला.      

              सविस्तर माहिती अशी की डाँगरकिंही परिसरात सर्वत्र राष्ट्रवादीचा बोलबाला असताना 15 वर्षापूर्वी अरुण येवले व इतरांनी मिळून मा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश करून शाखा उद्घाटन केले होते. त्यातील अनेक जण परत गेले परंतु अरुण येवले हे कोठे गेले नाहीत. सत्ता नसताना त्यांनी आपल्या परिसरात भाजपचे काम करत राहिले. पुढे त्यांनी मा. आजबे काकाच्या नेतृत्वाखाली काम केले त्यांनी त्यावेळी डोंगरकिंही प.स.गणाची निवडणूक लढवली.या परिसरात सर्वांना सोबत घेऊन काम केले.ता सरचिटणीस शक्तिकेंद्रप्रमुख यापदावर काम केले पण या पार्टीत नेताच कोण आहे हे समजत नाही.दर वेळी वेगळाच डाव तेही निवडणुकी पुरता परत कार्यकर्ता काय करतो कुठे आहे हे कोणीही पाहत नाही.या पक्षात काम किंमत राहिली नाही.त्यामुळे या ठिकाणी काम न करता आ आजबे काका सोबत काम करत या परिसरात घराघरात राष्ट्रवादी पक्ष पोहचविण्याचे काम करण्यासाठी यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, रामकृष्ण बांगर साहेब , दिपक घुमरे,शिवभूषण जाधव, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या