महाराष्ट्रावरील संकटदूर व्हावे म्हणून तुळजाभवाणीला घालणार साकडे -अ‍ॅड.संगिता चव्हाण


 

रणरागिणी महिला प्रतिष्ठाणचे दुर्गा महोत्सव

बीड, दि.6 (प्रतिनिधी)ः- प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी शिवसेना प्रणित रणरागिणी महिला संघटनेच्यावतीने तुळजापूर येथून तुळजा भवाणीचे दर्शन घेवून पायी ज्योत आणत देवीची प्राणप्रतिष्ठा करत दुर्गा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिताताई चव्हाण यांनी सांगितले आहेत.

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना प्रणित रणरागिणी महिला प्रतिष्ठाणच्यावतीने महाराष्ट्रावर येत असलेल्या संकटे दूर व्हावे यासाठी साकडे घालून तूळजापूर येथून पायी ज्योत आणाणार आहे. ही ज्योत आणून देवीची घटस्थापना बीड शहरातील टीपीरोड येथे करण्यात येणार असून संपूर्ण नऊ दिवस महिलांसाठी विशेष कार्यक्रम व अनेक स्पर्धेचे आयोजन केलेले आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील रणरागिणींनी पहिल्यांदाच अशा अनोखा उपक्रम घेत आहे. तरी येथील विविध स्पर्धेत शहरातील महिला भगिणींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होता येणार असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिताताई चव्हाण व फरजना शेख यांनी केले आहे.

टिप्पण्या