पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अनेक दिवसा पासुन पैठण पंढरपुर रस्त्याच्या गुत्तेदार, सुशोभिकरण करतील,या प्रतिक्षेत होता, मात्र गुत्तेदार चौक सुशोभिकरण करण्याचे नाव घेईना त्यामुळे आज पर्यंत प्रतिक्षेतच राहिला.
गुत्तेदार चौक करत नसल्याचे समजताच भिमसैनिक प्रदिप जावळे व भिमसैनिक सुरज जावळे यांनी स्वखर्चाने पाटोदा तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभिकरन केले. याकामात किशोर उपदेशी,प्रविण जावळे,निशांत ओव्हाळ,अमोल सुरवसे,चंद्रकांत निशीगंध,सुनिल अंभोरे यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा