महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रत्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - दिपक घुमरे


 

पाटोदा:गणेश शेवाळे

बंद कोणासाठी आणि कशासाठी ना आमचा महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी जे वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवले गेलेत,ना सरकारी यंत्रणांविरुद्ध,जी केंद्राचा दबावात येवून अधिकारांचा गैरवापर करते,ना महाराष्ट्र आर्थिक अडचणीत असताना gst परताव्या साठी,ना १२ आमदारांसाठी ज्यांची निवड असंविधानिक रित्या महाराष्ट्राचे (भाजपचे) महामहीम राज्यपाल जे पक्षपात करताना कोणालाच लाजत नाहीत त्या साठी,ना नैसर्गिक संकटात आर्थिक मदत करताना महाराष्ट्रावर जाणून बुजून अन्याय करतात.


हा बंद असेल त्या शहिद शेतकरी बांधवांसाठी,जे गेले दहा महिने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा हक्कासाठी लढत आहेत, ज्यांच्यावर अन्याय तर होतोयच पण त्यांना दहशतवादी घोषित केले गेले आहे आणि आता तर दिवसा ढवळ्या त्यांना गाडीखाली चिरडले जात आहे,त्याच प्रकारे जसे भगतसिंह,सुखदेव,राजगुरू आणि असंख्य असे हूतात्मे ज्यांना इंग्रज सरकार ने देशाचा स्वातंत्र्या साठी लढताना दहशतवादी घोषित केले होते आणि त्यांना देखील आपल्या प्राणाची आहुती या भारत मातेसाठी द्यावी लागली होती पण शहीद शेतकऱ्यांचे बलिदान वाया नाही जाणार प्रत्येक जुलमाचा हिशोब होणार.


  महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शेतकऱ्यांच्या खंबीर पणे पाठीशी असून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी 11 ऑक्टोंबर ला महाराष्ट्र बंद चे आव्हान केले आहे.


हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे,माजी आमदार अमरसिंह पंडित,आमदार बाळासाहेब आजबे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर,प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दिपक घुमरे यांनी केले आहे.

टिप्पण्या