पाटोदा :(गणेश शेवाळे)
डोंगरकिन्ही सर्कल प्रमुख मधुकर येवले जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आल्यापासून आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना भर देत मधुकर येवले यांनी डोंगरकिन्ही गटामध्ये कामे खेचून आणली असून त्या जोरावर नागरिकांच्या चर्चेतून त्यांनी डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून डोंगर किनी जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामे आणली असून येणाऱ्या काळामध्ये जनतेला वेगवेगळ्या योजना देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम असल्याने डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातून सर्कल प्रमुख मधुकर येवले यांनी निवडणूक लढवावी असे चर्चा व मागणी नागरिक करत आहेत त्यांच्या या मागणीचा विचार करून मधुकर येवले रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा