सरकारच्या गलथान कारभारा विरोधात दीपावलीच्या दिवशी कॉ.महादेव नागरगोजे यांचे तहसिलच्या दारात बोंब मारो आंदोलन



पाटोदा : शिव जागृती न्यूज नेटवर्क


गेल्या दिड महिन्यापासून सतत धार व मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट, पुर या मुळे तालुक्यात मनुष्यहानी, पशुहानी होऊन शेतकऱ्यांची खरिपाची संपूर्ण पिके उध्वस्त होऊन शेतात शेततळे तयार होऊन संपूर्ण पिके सडून गेली शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून खडकापरेंत गेल्या या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्याची रब्बी ची पेरणी सुद्धा वेळेवर होऊ शकत नाही आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने दसऱ्यानंतर लगेचच सुरू होणार पुन्हा शेतकऱ्याची ओढ कारखान्याकडे अशा दुहेरी तिहेरी संकटात शेतकरी सापडला असून राज्य व केंद्र सरकार बग्याची भूमिका घेत असून लोक प्रतिनिधी मात्र शेतकऱ्याच्या पिकाची मनुष्य हानीची पशुहनीची मोकर पाहण्या करून मीडियामध्ये मोकार शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळून दौऱ्याच्या निमित्ताने सरकारी तिजोरीवर बोजा टाकून मोकळे झाले आहेत. म्हणतात ना "देणे ना घेणे खंदीला लावून येणे" असे म्हणे आता राज्यासाठी सरकारने जिरायतीसाठी १० हजार बागायतीसाठी १५ हजार व बहु वार्षिक साठी २५ हजार रुपये प्रति हक्टरी ही मदत २ हेक्टरी परेंत देण्यात येईल असे जाहीर केलेले आहे. अशे जाहीर करून शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम चालवले आहे त्यात पुन्हा कालच्याला शासकीय अनुदान मिळवण्यासाठी पंचनाम्याचा जीआर शासनाने काडलेला आहे हा दिवसा ढवळ्या. शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे शेतकऱ्याची खरीप पिकाची आणेवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांनी ५१ पैशाच्या पुढे लावलेली आहे ज्या मुळे शेतकरी पिकविम्या पासून वंचित राहणार आहे.

   त्यात पुन्हा संजयगांधी,श्रावणबाळ, परिरक्त्या यांचे पुन्हा मानधन गेल्या चार महिन्यांपासून थकीत ठेऊन यांची दिवाळी कशी साजरी होणार नाही याची पुरेपूर दखल घेतलेली आहे. या सगळ्या परिस्थिती चा गांभीर्य पूर्वक विचार करून खालील मागण्याची त्वरीत सोडवणूक करावी नसता दिनांक : ४ नोहेंबर २०२१ रोजी आपल्या कर्यालयासमोर भर दीपावलीच्या दिवशी बोंब मारो आंदोलन खालील मागण्यासाठी

१)आपण देऊ म्हटलेले जिरायतीसाठी १० हजार, बागायती साठी १५ हजार व बहुवार्षिक साठी २५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्वरीत जमा करा. शासकीय मदत J R मधील पंचनाम्याची अट रद्द करावी.

२) संजय गांधी,श्रावणबाळ, व परितक्त्या इत्यादींचे थकीत मानधन त्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करा.

३) पेट्रोल, डिझेल ची वाढलेली भरम साठ दरवाढ मागे घ्या.महागाईला आळा घाला 

४)शेतकरी विरोधी संमत करण्यात आलेले तीन काळे कायदे रद्द करा.

  अशा प्रकारच्या मागण्याचे निवेदन कॉ. महादेव नागरगोजे, कॉ. भगवान जावळे, कॉ. सुधाकर शिरसट, कॉ. विठ्ल पवळ, गौतम जावळे, कॉ.अतुल देवडे, अशोक नागरगोजे इत्यादींने सादर केले.

टिप्पण्या