नाळवंडीत भव्यदिव्य तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न


 

पाटोदा :गणेश शेवाळे

 महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांचे कुलदैवत तुळजाभवानीच आहे. उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे परिवारही याला अपवाद नव्हते. त्यांचे पूर्वज तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते. ते नियमितपणे तुळजापूरला जात असत. त्यातूनच त्यांना आपल्या गावात, राहत्या ठिकाणी तुळजाभवानीचे मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपल्या पाटोदा तालुक्यातील जन्मगावी नाळवंडी येते भव्यदिव्य मंदिर बांधले नाळवंडी येथे उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदीराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आमदार सुरेश धस, मराठा गौरव युवराज भाऊ वस्ताद,सभापती भगवान मुरुमकर, अजय काशिद,यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून नाळवंडी गावात भव्यदिव्य मंदिर झाल्याने गावाच्या वैभवात वाढ झाली.

पंचक्रोशीतून तुळजाआईच्या दर्शनासाठी भावीक येत असून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवराचे गावकर्याचे तसेच भाविक भक्तांचे आभार युवानेते शिवाजीराव काकडे यांनी मानले

टिप्पण्या