स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीत सरकारची, पाटोदा तहसिल कडुन दिशाभुल;अनेक सातबारे डिजीटल झालेच नाही,तर मोफत वाटणार कसे?
पाटोदा :गणेश शेवाळे
सरकारने शेतकऱ्यांना विविध योजना व इतर कामासाठी आपल्या शेतीचा सातबारा कुठेही मिळवावेत व शेतकऱ्यांचे काम सोपे व्हावेत सरकारी कामासाठी लागणारे सातबार्यासाठी तलाठी कार्यालयात चक्करा होऊ नये म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सर्व शेतकऱ्यांना मोफत घरपोच सातबारा देण्याची मोठी घोषणा केली असल्यामुळे पाटोदा तहसिलने ही महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा घरपोच देण्याचा शुभारंभ प्रभारी तहसिलदार यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला.
प्राथमिक स्वरुपात पाच दहा शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आले माञ गांधी जयंती होऊन चार दिवस झाले तरी पाटोदा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना डिजीटल मोफत सातबारा भेटले नाहीत तर काही शेतकरी कामा निमित्त अॉनलाईन केंद्रा वरून सरकारी कामासाठी डिजिटल सातबारा काढु लागले मात्र तुमचा सातबारा अजून डिजीटल झाला नाही असे उत्तर मिळाल्या नंतर शेतकरी निराश होऊन तलाठी शोधू लागले तर गावाकडं जाऊन शेजारच्याना तुमचा मोफत डिजीटल सातबारा मिळाला का ?विचारु लागले आमचा तर डिजीटल सातबारा अॉनलाइन केंद्रा मध्ये फिस भरूनही मिळाना! मग हे पाटोदा तहसिल महसुल विभाग मोफत कधी वाटणार? अशी खरमरीत चर्चा करत असल्याने सरकारने केलेल्या घोषणेचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सरकारची दिशाभुल पाटोदा तहसिल करत आहे का? असा मोठा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा