पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील पारनेर येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागेशवाडी शिवारात शेतात संतोष थोरवे नामक शेतकऱ्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे , तथाकथित पारनेर येथील पारधी समाजातील हत्याकांड घडले असतानाच आज सापडलेल्या मृत शवामुळे पारनेर परिसरात खळबळ उडाली असून संतोष थोरवे नामक शेतकरी हे स्वताचा ट्रॅक्टर घेऊन शेती कामासाठी नागेशवाडी शिवारात गेले होते, तर नंतर दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला तदनंतर थोरवे यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलीस स्टेशन मिळाल्यानंतर पोलिस स्टेशनचे मनीष पाटील तसेच पीएसआय अफरोज पठाण तपास अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल सुनील सोनवणे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले ,शवविच्छेदनासाठी मृतदेह पाटोदा येथील सरकारी रुग्णालयातमध्ये नेण्यात आला आहे, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पुढील तपास मनीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाळू सानप, सुनील सोनवणे , टेकाळे हे करत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा