तेजस अर्बन बँकेने लोकांचा विश्वास कमावला: आ.सुरेश धस


 

वैद्यकिन्हीत तेजस अर्बनचे शाखा उद्घाटन, कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटोदा: शिव जागृती न्यूज

ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी तालुक्याला जावे लागते, यात वेळ आणि खर्चही होते. हेच टाळण्यासाठी तेजस अर्बन बँकेने ग्रामीण भागात शाखा सुरू करून लोकांची अडचण दूर केली आहे. अल्पावधीत तेजस अर्बनने नावलौकिक मिळवला असून हे शक्य झाले ते केवळ विश्वासामुळे. बँकिंग क्षेत्र पुर्णतः विश्वासावर अवलंबून असून तो विश्वास कमविण्यात प्रकाश कवठेकर यशस्वी झाले आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार सुरेश धस यांनी केले.

तेजस अर्बन मल्टीनिधीच्या वैद्यकिन्ही (ता.पाटोदा) शाखेचे उद्घाटन दि.५ रोजी करण्यात आले.यावेळी आमदार सुरेश धस बोलत होते. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, तेजस अर्बन बँकेने बीड, डोंगरकिनी पाठोपाठ वैद्यकिन्ही येथे आपली तिसरी शाखा सुरू केली आहे. बँकेने लोकांचा विश्वास संपादन केला असून ही बँक आता लोकांची विश्वासू बँक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. बँकींग क्षेत्रात विश्वास महत्त्वाचा असून प्रकाश कवठेकर यांनी लोकांचा विश्वास मिळविला आहे. येणाऱ्या काळात या बँकेत पाटोदा, बीड तालुक्यातील नागरिकांनी निःसंकोचपणे व्यवहार करावेत, असे आवाहनही आमदार सुरेश धस यांनी केले. 

प्रकाश कवठेकर यांनी प्रास्ताविक करताना बँकेची वाटचाल आणि सामान्य नागरिकांना कर्ज देऊन व्यवसाय उभारणीसाठी कसे सहकार्य केले, हे सांगितले. शिवाय तरुणाना व्यवसाय उभारणीसाठी बँक कायम पाठीशी असेल असा विश्वास व्यक्त केला. 

ह.भ.प लक्ष्मण महाराज म्हणाले, जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे, याप्रमाणे सर्वांनी व्यवहार केले पाहिजेत. गरज असेल तर कर्ज काढावेत, असे ते म्हणाले. तर महेंद्र गर्जे म्हणाले, तेजस अर्बन बँकेने ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला बचत गटांना कर्ज देऊन मोठे सहकार्य केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून आज अनेक छोटे मोठे उद्योग उभा राहीले आहेत, या बँकेचे काम कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. 

कार्यक्रमास नारायण गडाचे ह.भ.प.महंत शिवाजी महाराज, ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प.शिवाजी महाराज येवले, ह.भ.प.संतदास महाराज शिंदे, ह.भ.प.रंधवे महाराज, ह.भ.प.राधाताई महाराज, ह.भ.प.नाना महाराज कदम, ह.भ.प.महादेव महाराज, ह.भ.प.अर्जुन महाराज शिंदे, ह.भ.प.बाबासाहेब महाराज शिंदे, ह.भ.प. मारूती महाराज चोरमले, रामकृष्ण बांगर, सभापती बळीराम गवते, अमर निंबाळकर , माऊली जरांगे, रंगनाथ धोंडे ,हरीबप्पा घुमरे, डॉग़णेश ढवळे, किरण बांगर, महेंद्र गर्जे, महेंद्र नागरगोजे, बळीराम पोटे, केशव रसाळ, अतुल मकाळ, नरसिंग सिरसट , दिपक बांगर , आण्णासाहेब भोसले , अनिल काथवटे, आप्पासाहेब येवले , राजु जाधव, चाऊस , बीओ तुकाराम जाधव , शाहीद सर , सालार पठाण, पांडुरंग नागरगोजे , नामदेव जाधव , प्रकाश शेठ देसरडा , बाबुराव नागरगोजे ,रतन बहीर सर , गणेश मुढे , हणुमान शेलार , संजय भाकरे , अभिमान कंठाळे, अभिमान डोके, बाळासाहेब ढोरे , संभाजी सुर्वे , बापुराव राजपुरे , संभाजी येवले , सचिन डिडुळ , हरी तांबे सर , जेलर महादेव पवार ,विजय लाटे ,अभय पवार, बालासाहेब चौरे, ॲड संभाजी कोकाटे , शेषेराव कदम , परसराम आरसुळ, भारत आरसुळ उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा महादेव जायभाये व शंकर शिंदे यांनी तर संचालक रामदास ठोसर व संतोष कवठेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास पाटोदा, बीड तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या