गावा-गावात आ. आजबे यांचे जल्लोषात स्वागत; जनतेच्या समस्यांचा घेतायेत आढावा
पाटोदा: शिव जागृती न्यूज
कोरोना च्या भयंकर परिस्थिती मुळे गेल्या अनेक दिवसांपासून गावांना भेटी देता आल्या नव्हत्या परंतु आज काही प्रमाणात कोरोना कमी झाल्याने;आपण प्रत्येक गावांमध्ये जाऊन पारावर बसून, ग्रामस्थांशी चर्चा करून, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या तात्काळ त्याच ठिकाणी कशा सोडवता येतील, यासाठी प्रयत्न करत असून , कोरोणा काळ असतानाही आपण मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये विकास कामे केली आहेत. जवळपास 300 कोटी रुपयांची विकासकामे आजपर्यंत मतदारसंघात मंजूर करून आणले आहेत.यापुढे प्रत्येक गावांमध्ये जाऊन पारावर बसून गावातील समस्या व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आ. बाळासाहेब आजबे काका यांचा शनिवार दि.13 नोव्हेंबर रोजी पाटोदा तालुक्यात पाचंग्री,मंजरी घाट, बोडकेवाडी, ब्राह्मणवाडी ,अनपटवाडी, पारगाव घुमरा गावामध्ये गाव भेट दौरा झाला यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा घुमरे, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर, पाटोदा तालुका अध्यक्ष भूषण दादा जाधव, युवक तालुका अध्यक्ष युवराज पाटील,सभापती गोवर्धन सानप,बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब भराटे ,अविनाश पवार ,बाळासाहेब बांगर ,आनंद घुमरे,अभिजीत मुंडे,अशोक बांगर, रामचंद्र मकाळ,अविनाश मुंडे, सुरेश बडे,श्रीकांत कुडके, नानासाहेब कोठेकर, ऋषिकेश मुंडे, साजिद भाई, काँग्रेसचे युवराज कोकाटे,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांची संवाद साधताना आ. बाळासाहेब आजबे म्हणाले की कोरोना परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये येता आले नाही परंतु तरीसुद्धा आपण प्रत्येक गावांमध्ये विकासकामे केली आहेत. यापुढेही गावाला अत्यावश्यक असणारे विकास कामे प्राधान्याने करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.गावांमध्ये पारावर बसल्याशिवाय गावातील खऱ्या समस्या लक्षात येत नाहीत,म्हणूनच आपण हा " गाव भेट दौरा" ठेवला आहे. गावातील खऱ्या अडचणी समजावून घेऊन त्या तात्काळ कशा सोडवता येतील हे पाहणे गरजेचे आहे.
या गावभेट दौऱ्यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे काका यांचे गावा-गावांमध्ये तोफा,ढोल ,ताशा वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले.अनेक सार्वजनिक व वैयक्तिक कामे काकांनी एका फोनवर मार्गी लावत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाचंग्री बोडकेवाडी मंजरी घाट ब्राह्मणवाडी अनपटवाडी पारगाव घुमरा या गावातील लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या पारावर बसूनच तात्काळ सोडविण्यात आ. आजबे काका यांनी प्राधान्य दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा