शेतकऱ्यांवर अन्याय करणे थांबवावे,नसता महावितरण अधिकाऱ्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही - रामेश्वर जाधव


 

पाटोदा: शिव जागृती न्यूज


शेतकरी राजा आधीच अनेक संकटाचा सामना करत असताना कुठे तरी येणाऱ्या पिकावर आपला संसाराचा गाडा सुरळीत चालेल अशी आशा धरून होता, मात्र पीकाला पाणी देण्याच्या वेळेस मोगला सारखी वसुली करण्याचे कारस्थान महावितरण ने सुरू केली आहे. महाविरण कंपनीने शेतकऱ्यांना ना कोणती नोटीस ना कसलीही मुदत न देता शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे कनेक्शन कट करु लागले असल्याने शेतकरी राजा हवाल दिल झाला आहे.यावर कोणीही बोलायला तयार नाहीत यामुळे महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्याचे काम चालू असल्याने तालुक्यातील विद्युत कनेक्शन तोडनी थांबवावी व शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा सुरळीत करून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवावा,नसता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही,असा इशारा आमदार सुरेश धस कट्टर समर्थक युवा नेते रामेश्वर जाधव पाटील यांनी दिला आहे.

टिप्पण्या