सर्व शिक्षण संस्थाना सरसकट वेतनेत्तर अनुदान द्या शिक्षण संस्था च्या अधिवेशनात दिपक घुमरे यांची मागणी


  


नाशिक: शिव जागृती न्यूज


राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना सरसकट वेतन व वेतनेत्तर अनुदान द्यावे अशी मागणी शिक्षण संस्था महामंडळ बीड जिल्हा अध्यक्ष तथा औरंगाबाद विभागीय सहकार्यवाहक दिपक घुमरे यांनी केली.


नाशिक येथे शिक्षण संस्था महामंडळ राज्य अधिवेशन, देशाचे नेते राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा शरदचंद्रजी पवार व नामदार छगनभुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. अधिवेशन दोन दिवस चालले. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात विभागीय सहकार्यवाहक दिपक घुमरे यांनी अनेक प्रश्न मांडले, त्यांनी असे सांगितले कि सन 1999-2000 नंतर अनुदानावर आलेल्या शाळांना शासनाकडून वेतननेत्तर अनुदान 0% मिळते, मग या शाळा चालवायच्या कोठून, शासन एकीकडे सर्वाना शिक्षण मोफत शिक्षण द्या म्हणतय आणि दुसरीकडे शाळांना वेतनेतर अनुदान एक रुपया देखील देत नाही. शाळांकडे ना स्टेशनरी घ्यायला पैसे,ना खडू घ्यायला पैसा, मग शिक्षक शिकवणार कसे 2008 च्या शासन निर्णयानुसार काही शाळांना 5% प्रमाणे वेतनेतर अनुदान मिळते.त्यांना वार्षिक पंधरा ते वीस हजार मिळतात त्यांनी त्या पैश्यात इमारत भाडे द्यावे कि रंगरंगोटी करावी कि खडू घ्यावे.ग्रामीण भागात यामुळे शिक्षणाची दुरावस्था होत आहे अनेक संस्था मध्ये इंग्रजी व गणित शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत मग विध्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण कसे द्यावे ,विनाअनुदान शाळांना 15 वर्ष्यापासून प्रचलित नियमाप्रमाणे वेतन अनुदान दिले जात नसेल तर शिक्षक उपाशी पोटी शिकवणार कसे असे शासनाने गेल्या नऊ महिन्यापूर्वी संस्थेतील सेवक उडवून टाकले मग शाळा स्वच्छ कोण करणार, शाळांची घन्टा कोण वाजवनार, शिक्षक कि विध्यार्थी असे प्रश्न उपस्थित करताच सभागृह सुन्न झाले. 


या अधिवेशन नंतर खा शरदचंद्रजी पवार साहेबानी अर्थ मंत्री व शिक्षण मंत्री यांच्या सोबत स्वतंत्र बैठक लावून प्रश्न निकाली काढू असे संबोधित केले.


या अधिवेशनास बीड जिल्ह्यातून दिपक घुमरे जिल्हाध्यक्ष ,उत्तम पवार ,प्रा सुशीलाताई मोराळे ,रामकृष्ण बांगर ,गोविंद वाघ ,महादेव काळे ,सुभाष पावळ ,नवनाथ थोटे ,दिलीप ख्रिस्ती ,कारंडे संभाजी ,दत्ता वाळस्कर आदींनी सहभाग नोंदवला.

टिप्पण्या