पाटोदा: शिव जागृती न्यूज
येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन व मतदार नोंदणी जनजागृती उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळीराम राख होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व संविधान पूजन करण्यात आले. व्यासपीठावर पदव्युत्तर विभाग संचालक प्रा. डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, कार्यालय अधिक्षक अशोक पवार उपस्थित होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. महादेव मुंडे यांनी केले. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीप्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देत लोकशाही शासनव्यवस्थेत मतदानाचे महत्व विषद केले. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बळीराम राख म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे अध्ययन व तिची माहिती मर्यादित लोकांपर्यंतच न राहता संविधानाचा अभ्यास प्रत्येक भारतीय नागरिकाने केलाच पाहिजे. यामुळे नागरिकांना आपल्या संवैधानिक अधिकार व कर्तव्यांची पुरेपूर जाणीव होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कुशाबा साळुंके यांनी केले. आभारप्रदर्शन रासेयो समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश पाचकोरे यांनी केले. कार्यक्रमास रासेयो समन्वयक डॉ. अनिता धारासूरकर, डॉ. यादव घोडके, डॉ. पंडित सिरसट, डॉ. प्रमोद गायके यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा