कोविडकाळात विधवा झालेल्या माता भगिनींनी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा' योजनाचा लाभ घ्यावा - दिपक घुमरे
पाटोदा : शिव जागृती न्यूज
कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात विधवा झालेल्या माता भगिनींनी साठी 'वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना' लागू करण्याचा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आला आहे.
कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी 'वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना' राबविण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील महाराष्ट्र शासन निर्णय काढला असल्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोना मुळे आपला पती गमवलेल्या माता भगिनीनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दिपक दादा घुमरे यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा