अधिपती अर्बन यांच्या कडून दिवाळी निमित्त व्यापारी बांधवांना शुभेच्छांसह मिठाई वाटप


 पाटोदा : शिव जागृती न्यूज

पाटोदा तालुक्यात अल्पशा कालावधीत ग्राहकांचे मन जिंकून अधिपती अर्बन व त्यांच्या टिमने व्यापाराच्या मनात जागा निर्माण केली असून दीपावलीच्या सणा निमित्त सर्व ग्राहकांची दिवाळी गोड करण्याचे काम अधिपति अर्बन चे चेअरमन दीपक गर्जे यांनी केले आहे धकाधकीच्या काळामध्ये कोणी कोणाकडे जात नाही सर्व जन आपल्या व्यवसायात मग्न आहेत यामुळे माणूस माणसापासून लांब चालेला आहे यामुळे अधिपती अर्बन यांनी ग्राहक हे आपले कौटुंबिक सदस्य असल्यामुळे शहरातील व्यापार पेठेत जाऊन व्यापारी बांधवाना भेटुन अधिपती अर्बनच्या वतीने दिपक गर्जे यांनी शुभेच्छां सोबत मिठाई वाटप केली, दिपक गर्जे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत ह्या आधीही दिपक गर्जे यांनी सावली फाउंडेशन च्या माध्यमातून अनाथ मुले,विधवा महिला , शेतकरी बांधव यांच्या साठी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून यावर्षी त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचा सर्व व्यापारी बांधवातून कौतुक होत आहे

टिप्पण्या