पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा-चुंबळी फाटा रोडवर गितेवाडी फाट्याजवळ ट्रक ,मोटरसायकल अपघातात विष्णू वाघ यांचा मृत्यू झाल्याची घटना दि.13 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
विष्णू गोरख वाघ (वय 53 वर्ष) हे तालुक्यातील वाघाचा वाडा येथील रहिवासी होते, ते काही कामानिमित्त मोटरसायकलवर पाटोदा येथे आले होते त्यांचे काम आटोपल्यावर ते गावाकडे निघाले असता गितेवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगात असणाऱ्या ट्रक क्रमांक केए 56 3193 ची जोराची धडक मोटरसायकलला बसल्याने अपघातात मोटरसायकलस्वार विष्णू वाघ हे जागीच ठार झाले. ट्रक चालक जागेवरच ट्रक उभी करून पळून गेला,सदर घटनेची माहिती पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व मयतास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात वाघाचावाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आलाआहे.अधिक तपास पोहेकॉ भोसले हे करीत आहेत.
विष्णू वाघ हे प्रगतिशील शेतकरी होते,त्यांचा गावातील धार्मिक,सामाजिक कार्यात सहभाग असे, त्यांच्या अपघाती निधनामुळे वाघाचा वाडा येथे शोककळा पसरली आहे. वाघ यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.वाघ परिवार यांच्या दुःखात शिव जागृती न्यूज परिवार सहभागी आहे.
Very difficult situations
उत्तर द्याहटवा