दीपावलीच्या सणा दिवशी पाटोदा शहरातील मेन रस्त्यावर लाईट नसल्याने निष्क्रिय लोकप्रतिनिधी व गलथान अधिकाऱ्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावरील पोलवर टेंबे लावून केला निषेध
पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील पोलवर विद्युत दिवे बसवावा अशी मागणी अनेक दिवसा पासून होत होती त्यातच देशातील सर्वात मोठा सण दिवाळी सण आलेला असतानाही पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पाटोदा शहराच्या प्रमुख बाजारपेठे मध्ये सर्वत्र अंधारच अंधार असतो त्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री शहरातील मोठी व्यापार पेठ असल्याने चोऱ्याही होऊ शकतात तसेच दिवाळी सणा निमित्त लोक खरेदी साठी बाहेर निघतात मात्र शहरातील मुख्य बाजार पेठेत अंधार असल्यामुळे आपघात शकतात यामुळे तात्काळ प्रशासानाने शहरातील प्रमुख बाजार पेठ असलेल्या छञपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावरील विद्युत पोल वर तात्काळ विद्युत दिवे बसवावे नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करु इशारा देऊन ही दीपावलीच्या सणा दिवशी पाटोदा शहरातील मेन रस्त्यावर विद्युत दिवे बसवन्यात न आल्याने निष्क्रिय लोकप्रतिनिधी व गलथान अधिकाऱ्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने लक्ष्मी पुजनाच्या दिवशी पाटोदा शहरातील मेन रस्त्यावरील पोलवर टेंबे लावून क्रेंद व राज्य सरकारचा निषेध केला यावेळी गोरख झेंड, बाळासाहेब गायकवाड, सुनील जावळे,पवळ मामा,बाळासाहेब जाधव, डॉ गायकवाड व इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यक्रते उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा