पाटोदा : शिव जागृती न्यूज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विलिनीकरण राज्य सरकार मध्ये करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा प्राप्त करून द्यावा, अशी मागणी भारतीय कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी पाटोदा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनिकरण करुन घ्यावे,आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात विषमता वादी वातावरण होत आहे. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांच्या कष्टाचा मोबदला मागत आहेत. तो त्यांचा हक्क आहे. कर्मचाऱ्यावर प्रवाशांच्या जिवनाची जिम्मेदारी आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना लापरवाही करता येत नाही त्यांच्यावर खुप मोठी जबाबदारी आहे. त्यांना कष्ट जास्त आणि पगार (वेतन) कमी ही विषमता महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा त्यांना वेगळे का धरले जात आहे.
रा.प.म.कर्मचाऱ्यांचा संप सुमारे बारा दिवस झाले महाराष्ट्रात चालु आहे, जो घाम गाळतो, कष्ट करतो त्यांच्यावरच आत्तापर्यंत अन्याय केलेला आहे. समान काम, समान वेतन असायला हवे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये नौराश्याचे वातावरण आहे, ते दुर करायचे असेल तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी विनंती भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी लेखी निवेदनाव्दारे उपविभागीय अधिकारी कार्यालय, ता.पाटोदा जि.बीड मार्फत मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. व माहितीस्तव निवेदनाच्या प्रति मा.ना.अनिलजी परब साहेब, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य,मुंबई, मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य,मुंबई, मा.आ.भाई जयंत पाटील साहेब, सरचिटणीस भारतीय शेतकरी कामगार पक्ष मुंबई यांना दिलेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा