गवळवाडीच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबांना पगाराची जिम्मेदारी सकल मराठा ग्रुपने घेतली!
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथे ऊसतोड मजूर अर्जुन गवळी यांचे दोन दिवसापूर्वी वयाच्या 35 व्यावर्षी आजाराने निधन झाले कुटुंब ऊसतोडी वर अवलंबून असल्याने कुटुंबाचा आधारच हरवला आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पगार सुरू करण्याची जबाबदारी सकल मराठा ग्रुप पाटोदा यांच्याकडून घेण्यात आली आहे.
दोन दिवसापूर्वी ऊसतोड मजूर अर्जुन गवळी यांचे आजाराने निधन झाल्याने त्यांचे पूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुली एक मुलगा सह पत्नी असे कुटुंब पूर्णपणे पोरके झाले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना काहीतरी आधार मिळावा या उद्देशाने सकल मराठा ग्रुप च्या वतीने त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे तसेच त्या मुलांच्या आईला आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पगार सुरू करण्याची देखील जबाबदारी घेण्यात आली आहे असे माहिती मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा