औरंगाबाद येथे पेन्शन महामेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहा - सतीश जाधव


 

पाटोदा : शिव जागृती न्यूज

 पेन्शन लढ्यातील शिलेदार बंधू-भगिनींनो महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची डी सी पी एस व एनपीएस योजना सुरु केली आहे. या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यांमध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण होते मात्र मागील सोळा वर्षात या डीसीपीएस एनपीएस योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्ती वेतन मिळताना दिसत नाही ज्यामुळे मागील सोळा वर्षात निवृत्त तसेच मयत झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शन पासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व मागील सोळा वर्षापासून विविध आंदोलने व निदर्शने करत आलेलो आहे. मात्र शासनाने फक्त आश्वासने देऊन वेळोवेळी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. दिनांक 02 डिसेंबर 2021 वार गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मराठा मंदिर सभागृह एस.बी. ओ. ए. शाळेजवळ, जळगाव रोड, औरंगाबाद येथे जिल्ह्यातील सर्व 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचा पेंशन महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास औरंगाबाद मधील सर्व कर्मचारी संघटनांचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व शिलेदार उपस्थित राहणार आहे. तरी औरंगाबाद मधील सर्व कर्मचाऱ्यांनी पेन्शन महा मेळाव्यास उपस्थित रहावे आशे आवाहन महाराष्ट्रराज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका अध्यक्ष वैजापुर सतीष जाधव यांनी केले आहे

टिप्पण्या