भाऊसाहेब शिवाजी तांबे यांची सैन्य दलातील सुभेदार पदावर निवड..!!

 



पाटोदा: शिव जागृती न्यूज


  पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथील सैनिक भाऊसाहेब शिवाजी तांबे यांची सैन्यदलातील सुभेदार या सर्वोच्च पदावर निवड झाली आहे.


तांबा राजुरी या गावामध्ये भाऊसाहेब शिवाजी तांबे उर्फ आण्णा यांचा एका गरीब कुटुंबांमध्ये 10 ऑक्टोबर 1974 रोजी जन्म झाला.


प्राथमिक शिक्षण 


भाऊसाहेब शिवाजी तांबे यांचे वय वर्ष एक ते सहा बालपण घरातच गेले आणि इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबाराजुरी या शाळेमध्ये पूर्ण केले.



माध्यमिक शिक्षण


 प्रथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अण्णांना त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाटोदा येथे हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला गेला आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.


उच्च शिक्षण


 शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अण्णांना उच्च माध्यमिक शिक्षण पद्मभूषण वसंत दादा पाटील कॉलेज पाटोदा येथे पूर्ण केले.


सैनिक म्हणून निवड


आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अण्णांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील सुभेदार हरिदास भागोजी तांबे व दिनकर बप्पा तांबे यांना आदर्श मानुन सैनिक होण्याचा निर्णय घेतला आणि 29/10/1994 रोजी सैनिक म्हणून निवड झाली.



ट्रेनिंग


सैनिक म्हणून निवड झाल्यानंतर अण्णांनी बेळगाव येथे आपले ट्रेनिंग पूर्ण केले.


कामगिरीवर निवड


प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर अण्णा प्रत्यक्ष आपल्या देशाच्या सेवेसाठी कलकत्ता येथे हजर झाले त्यांनी कलकत्ता येथे दोन वर्षे सेवा पूर्ण केली आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली नवशेरा जम्मु अँड काश्मीर येथे झाली.


कारगिल युद्ध



 जम्मू आणि काश्मीर येथे बदली झाल्यानंतर यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अशा तणावपूर्ण वातावरणामध्ये भारत आणि पाकिस्तान यामध्ये कारगिल युद्ध सुरू झाले. या कारगिल युद्धामध्ये आपल्या या जवानाने जिद्द चिकाटी धैर्याने शत्रूशी दोन हात केले.

     

जम्मू-काश्मीर कारगिल हे शब्द जरी कानावर पडले तरी अंगामध्ये एक स्पूर्ती प्रेरणा देशभक्ती निर्माण होते.

कारगील युद्ध संपल्यानंतर अण्णांची बदली पंजाब येथे झाली आणि त्यांनी पंजाब येथे तीन वर्षे आपली सेवा केली त्यानंतर पुन्हा जम्मू आणि काश्मीर येथे दोन वर्ष पुन्हा त्यांची बदली झाली. कारगिल येथे परत बदली झाल्यानंतर त्यानी तेथे दोन वर्षे सेवा पूर्ण केली.


प्रशिक्षक


बारा वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर अण्णांची नवीन भरती करण्यात आलेल्या जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी रायपूर येथे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. त्यानंतर आण्णांनी 3 वर्षं अरूणाचल प्रदेश येथे तीन वर्षे सेवा केली.


नायब सुभेदार


सतरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अण्णांची नायब सुभेदार या पदावर नियुक्ती झाली आणि त्यांनी जामनगर, सियाचिन, बेळगाव, आसाम या ठिकाणी नायब सुभेदार या पदावर आपली सेवा करत राहिले.


सुभेदार


अशाप्रकारे सैन्यदलामध्ये सेवा करत असताना भाऊसाहेब शिवाजी तांबे उर्फ आण्णांची सुभेदार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

       

नोकरी करत करत एक एक प्रमोशन घेत घेत आज तांबा राजुरी गावचे नागरिक भाऊसाहेब शिवाजी तांबे हे सुभेदार हे पद भूषवित आहेत आणि ही बाब आपल्या गावांसाठी, तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. अशा या आपल्या भूमी पुत्राला मानाचा सलाम करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शिव जागृती न्यूज परिवार च्या वतीने मन:पूर्वक अशा शुभेच्छा देतो.

टिप्पण्या