शंभरचिरा ते पाटोदा रस्ता याची झाली चाळणी


 

➡️ आमदार ,जिल्हा परिषद सदस्य मुग गिळुन गप्प का? वंचित करणार रस्त्याच्या मध्यभागी वृक्षारोपण


पाटोदा (गणेश शेवाळे)


 पाटोदा तालुक्यातील शंभरचिरा ते पाटोदा रस्ता याची मोठया प्रमाणावर चाळणी झाली असुन या रस्त्यावर रहदारी करणारयांना खडतर प्रवास करावा लागत असुन या र स्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्यावरील खडी संपुर्णत: उघडी पडली असल्यामुळे दुचाकीचे अनेक अपघात याठिकाणी घडले आहेत.अनेकांचे अपघात होवुन दुखापती झाल्या आहेत. शंभरचिरा ते पाटोदा हा रस्ता अंदाजे तीन किलोमीटरचा असुन संपुर्ण रस्त्याची चाळणी झाली आहे, गेल्या पाच वर्षांपासून हा रस्ता खड्डेमय झाल्याने पाटोदा तालुक्यातील गावातील नागरिकांना खड्यातुन प्रवास करावा लागत आहे,तर रहदारी करणारया वाहनधारकांचे मोठे नुकसान होत असुन मान,पाठ,कंबरेचा मोठा ञास उध्दभवत आहे.


  या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. सत्ता येताच रस्ते करु, म्हननारे आमदार साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य गप्प असल्याने,पाटोदा ते शंभरचिरा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा ते शंभरचिरा हा रस्ता यावर मध्यभागी वृक्षारोपण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाउपध्यक्ष गोरख झेंड,तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिला आहे.

टिप्पण्या