➡️ ज्यानी देवाला सोडले नाही ते तुम्हाला-आम्हाला काय सोडणार - महेबुब शेख
➡️ जाती पातीचे राजकारण करणाऱ्या हादपार करून तुमच्या साठी दिवस राञ काम करणाऱ्या उमेदवाराना एकवेळस कामकरण्याची संधी द्या- उमर चाऊस
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा नगरपंचायत निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख,माजी आमदार सुनील धांडे,माजी आमदार सय्यद सलीम यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हास्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष भुषण जाधव यांनी बोलताना म्हटले की, पाटोदा नगरपंचायतचा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. कोट्यावधी रुपये खाणार्या पुढाऱ्यांना जेल मध्ये घाला असे मत व्यक्त केले.
बाळा बांगर यांच्या तडाखेबाज भाषणाने वातावरण तापले असून नगरपंचायत मध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली ,भ्रष्टाचार करणाऱ्याना धडा शिकवा, हा बाळा बांगर तुमच्या सोबत कधीही खंबीर पणे उभा आहे. बाळासाहेब बांगर यांच्या कडक भाषणाने वातावरण तापले असून पाटोदा शहरात परिवर्तनाची लाट निर्माण झाली.
पाटोदा शहरासाठी आलेले सतरा कोटी गेले कुठे, विकासाच्या नावाखाली पैसे खाणार्याला हद्दपार करा असे गणेश कवडे यांनी मत व्यक्त केले. जाती पातीचे राजकारण करणाऱ्यांना हद्दपार करून तुमच्या साठी दिवस राञ काम करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा असे उमर चाऊस यांनी आवाहन केले.
एखादे काम कमी होऊद्या पण शहरात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराना मत द्या असे माजी आमदार सय्यद सलीम यांनी आपले मत मांडले.जे पाच वर्षात झाले नाही ते करण्यासाठी कॉग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराना मत द्या असे आवाहन माजी आमदार सुनील धांडे यांनी केले.
पाण्यात पैसे खाणार्या नेत्यांना ह्या निवडणूकीत पाणी पाजा.कोरोनाच्या काळात आम्ही काय केले असे विचारणाऱ्याना सांगतो, जे केले ते चांगलेच केले, इमानदारीनी लोकांची सेवा केली, कोणाला खोटं आश्वासन दिले नाही,तर कोरोना काळात काळाबाजार केला नाही, बोगस लाखो रुपायची बिल काढली नाही आसे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपल्या शुभारंभपर भाषणात मत व्यक्त केले.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, एकदा आमच्या ताब्यात नगरपंचायत द्या, पाटोदा शहराचा विकास करून दाखवतो, नाहीतर इथून मागे कोट्यावधी रुपये निधी येऊन ही पाटोदा शहराचा विकास कुठे दिसत नाही. ज्यांनी देवाला सोडले नाही ते तुम्हाला काय सोडणार अशी टिकाही आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली असून कॉग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराना प्रचंड मतानी निवडून द्या असे आवाहन यावेळी आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.
प्रचार शुभारभ प्रसंगी पाटोदा शहर राष्ट्रवादी मय झाले असून यावेळी कॉग्रेस राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यक्रते मतदार बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा