जाती पातीच्या राजकारणाला थारा न देता विकासासाठी भांडणार्या उमर चाऊसच्या नावाला प्रभाग दहा मध्ये मतदारांची पहिली पसंती


 

 पाटोदा : शिव जागृती न्यूज


पाटोदा नगरपंचायत निवडणूकी मध्ये आप आपल्या पक्षाची प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू असले तरी प्रभाग दहा मधील  कॉग्रेस पक्षाचे उमेदवार उमर चाऊस यांची प्रचाराची धुरा मतदारांनीच हाती घेतली असल्यामुळे कॉग्रेस पक्षाचे उमेदवार उमर चाऊस यांचा विजय पक्का असून प्रभाग दहा मधील मतदाराच जाती पातीच्या राजकारणाला थारा न देत, बारा महिने चोवीस तास सर्व सामान्य नागरिकांच्या सुख दु:खात सहभागी होणाऱ्या कोरोनाच्या संकट काळात दवाखाना असो या गोरगरीब नागरिकांना  किराणा सामान वाटणारे ,आपल्या भागात पहिल्यांदा डांबरी रस्त्या करणारे ,प्रभागातील नागरिकांना पाणी मिळावे म्हणून पाण्यासाठी सत्ता धार्याना भांडणारे दिव्यांग,विधवा तसेच जेष्ठ नागरिकांना संजय गांधी, श्रावण बाळ योजना शेकडो नागरिकांना मिळवून देणाऱ्या उमर चाऊस यांना मत म्हणजे  विकासासाठी आणि प्रामाणिक माणसासाठी, आपल्या प्रभागाच्या भल्यासाठी अशाच तरुणांना निवडुण दया, तरच विकास होईल अशी चर्चा मतदारात असल्याने प्रभाग दहा मधील मतदाराने जाती पातीच्या राजकारणाला थारा न देता विकासासाठी भांडणार्या उमर चाऊसच्या नावाला  मतदारांची पहिली पसंती  असल्याचे चिञ पाहायला मिळत आहे.

टिप्पण्या