पाटोदा तालुक्यात गारपिटीने व वादळी वाऱ्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी



 


पाटोदा: शिव जागृती न्यूज


गेल्या दोन वर्षापासून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून, खरीप हंगामातही वारंवार अतिवृष्टी होऊन खरिपाचे पीक संपूर्णतः वाया गेले होते. त्यातच आता संपूर्ण मदार ही रब्बी पिकांवर होती, शेतकरी रब्बी पिकांवर आशा धरून होता,अनेक शेतकरी हे कर्जबाजारी झाले होते,येणाऱ्या उत्पन्नातून थोडीफार आशा होती. 


पाटोदा तालुक्यात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्याने, गारपिटीत ज्वारी,गहू आदी रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 सर्व पिके अत्यंत जोमाने डोलत होती परंतु रात्री झालेल्या गारपिटीने वादळी वाऱ्याने उभे पिके आडवे झाली असून यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.


 खरिपाचे नुकसान होऊनही अद्याप पर्यंत संपूर्ण विमा जमा झालेला नाही. अनुदानही दुसरा टप्पा कधी येईल माहित नाही . त्यातच गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यांतील तांबा राजुरी उंबरविहिरा चुंबळी तळेपिंपळगाव धनगर जवळका आदी गावांतील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टिप्पण्या