भाऊसाहेब भराटे यांची सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड


 

पाटोदा : शिव जागृती न्यूज

तालुक्यातील वैजाळा गावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब भराटे यांची सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्र सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.

सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरपंचांच्या समस्या शासन दरबारी पोहचविण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी सरपंच परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी या सरपंच परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पाटोदा तालुक्यातील वैजाळा गावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब भराटे यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र दिले आहे.


 


सरपंच परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने बीड जिल्ह्यातील सर्व सरपंच यांच्या समस्या संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी पोहचविण्यासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात काम करून परिषदेच्या पदाला न्याय देऊ.

भाऊसाहेब भराटे सरपंच

वैजाळा ता.पाटोदा जि.बीड

टिप्पण्या