पाटोदा: शिव जागृती न्यूज
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे काका यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी पाटोदा तालुका उपाध्यक्ष अभिजीत मुंडे यांनी केली आहे.
लोकसभेला या मतदार संघातून मतदान कमि पडुनही शेतकरी पुत्र आ.बाळासाहेब आजबे हे आठ्ठावीस हजार मतानी निवडून आले आहेत. कोरोना सारख्या महामारी च्या काळातही आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात काही ना काही तरी काकांच्या माध्यमातून विकास कामांना गती आली आहे. काकांनी आपल्या थोड्याच कालावधीमध्ये आपल्या कामाची चुणूक दाखवून दिलेली आहे त्यांना अधिकाधिक काम करायला यावे यासाठी त्यांना येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिमंडळात स्थान द्यावे व त्यांना अधिकाधिक काम करण्याची संधी द्यावी, तरी लोकहितासाठी काकांना मंत्री करावे अशी मागणी पाटोदा तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष अभिजीत मुंढे यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा