पारनेर सरपंच अपात्र; पारनेर ग्रामपंचायत च्या सरपंचाचा भ्रष्टाचार उघड. सरपंचाला पदावरून काढण्याचे अप्पर आयुक्तांचे आदेश!
■ कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने ही कारवाई!
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील पारनेर ग्रामपंचायत अंतर्गत बेकायदेशीर रक्कम उचलून केलेला काळाबाजार हा शेवटी उघड झाला आणि तो सिद्ध देखील झाला असल्याचं काल अप्पर विभागीय आयुक्त यांनी जाहीर केले आहे ग्रामसेवक व सरपंच अर्चना संतोष नेहरकर यांच्या संयुक्त सहीने मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचा सिद्ध झाले आहे त्यामुळे सरपंच यांना त्यांच्या पदावरून काढण्यात यावे असे आदेश दिले आहेत.
पारनेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 14 व्या वित्त आयोगातून येणार्या रकमेची मोठ्याप्रमाणात अफरातफर केल्याचा व शासनाची फसवणूक केल्याचं नमूद केलं होतं ते सिद्ध करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला शेवटी अफरातफर शासनाची फसवणूक केल्याचं हे सिद्ध झाला आहे सरपंचाने आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाची फसवणूक केल्याचं सिद्ध झाल्याने अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी सरपंच यांना पदावरून हटवण्याची आदेश दिले आहेत.
■ शासनाची व जनतेची फसवणूक
पारनेरच्या सरपंचाकडून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर विभागीय आयुक्त कडून सरपंचाला पदावरून हटवण्याची आदेश देण्यात आले आहेत कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकत मोठ्या प्रमाणात काळाबाजार पारनेर ग्रामपंचायत अंतर्गत झाला होता.
■ सरपंचला पदावरून हटवण्याचे आदेश
पारनेरच्या सरपंचाने केलेल्या अफरातफरी मध्ये अप्पर विभागीय आयुक्त यांनी सरपंचाला पदावरून हटवण्याची आदेश दिले आहेत आता योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशी नागरिक मागणी करत आहेत हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम व शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा