नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्ह्यात वाढणार नऊ गट
बीड l शिव जागृती न्यूज
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 9 सदस्य वाढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्या प्रमाणे पाटोदा तालुक्यात एका जि.प. गटाची वाढ होणार आहे. म्हणजे आता चार जि.प. गट आणि 8 पंचायत समिती गण होणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक तालुक्यातील गट आणि गण संख्या जाहीर केली आहे.
नवीन रचनेनुसार बीड जिल्हा परिषदेत 69 गट असणार आहेत. तर प्रत्येक गटात 2 पंचायत समिती गण असतात. त्यामुळे तालुक्यातील गट संख्येच्या दुप्पट संख्या त्या तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांची असणार आहे.
जिल्ह्यात 9 जिल्हा परिषद गट वाढले असून शिरूर आणि धारूर तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गण वाढणार आहेत.
नव्या रचनेनुसार आष्टी 8, पाटोदा 4, शिरूर 4, गेवराई 10, माजलगाव 7, वडवणी 3 , बीड 9, केज 7, धारूर 3, परळी 7 आणि अंबाजोगाई 7 असे गट असणार आहेत.
super
उत्तर द्याहटवा