रोहयो मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन , जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करा- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
पाटोदा : शिव जागृती न्यूज
बीड जिल्ह्य़ातील मनरेगा अंतर्गत विविध कामातील गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई करत असल्याबद्दल जिल्हाधिकारी बीड, उपजिल्हाधिकारी रोहयो , मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद उपमुख्य कार्यकारी आधिकारी( पंचायत )जिल्हापरिषद ब तसेच गटविकास आधिकारी नरेगा कक्ष यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१३ डिसेंबर सोमवार रोजी ना. संदिपान भुमरे, रोहयो मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे,या आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, अशोक कातखडे, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, आदि सहभागी आहेत. ना.संदिपान भुमरे, रोहयो मंत्री दौ-यावर असल्याने त्यांच्या कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले.
या विषयी सविस्तर माहिती अशी की,
दोन वर्षापासून केज तालुक्यातील विविध गावातील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक विलंब केला जात असून चौकशीच्या समिती नेमण्याच्या नावाखाली तसेच तांत्रिक कारणे दाखवून दफ्तर दिरंगाई करण्यात येत असून ग्रामसेवक संघटनांच्या दबावाखाली जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ आधिकारी गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक विलंब करत आहेत त्यामुळेच संबधित प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल वरिष्ठ आधिकारी तसेच चौकशी समितीतील आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी त्यासाठी स्वतंत्र उच्च स्तरीय कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
आणि मौजे. शेकटा ता.गेवराई येथील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात मयतांना रोहयो मजुर दाखवून अपहार प्रकरणात प्रशासकीय आधिकारी भ्रष्टाचार दडपण्याचाच प्रयत्न करत असून गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करणे तसेच मौजे. मोरगांव ता.जि.बीड येथील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात रोहयो कार्यालयातुन संचिकाच गायब प्रकरणात तसेच मौजे गोलंग्री ता.जि.बीड येथील बांधबंदीस्ती अपहार प्रकरणात अपहारीत रक्कम वसूल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल तसेच वारंवार निवेदन देऊन व कामबंद आंदोलनाची धमकी देऊन बीड जिल्हाप्रशासनावर दबाव आणून वर्तमानपत्रात जिल्हाप्रशासनाची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जि.बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हासरचिटणीस यांच्यावर महाराष्ट्र जिल्हापरिषद सेवा (शिस्त व अपिल)१९६४ मधिल तरतुदीनुसार व अनुषंगिक नियमांअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी देऊन सुद्धा अद्याप कारवाई न केल्याबद्दल संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आदि मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा