आष्टी मतदारसंघात 35 कोटी 74 लक्ष रुपयेच्या 144 की.मी लांबीच्या पानंद रस्त्यांना मंजुरी- आ बाळासाहेब आजबे


 

 ■ मातोश्री पानंद रस्ता योजनेतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार!


आष्टी : शिव जागृती न्यूज

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मातोश्री पानंद रस्ता योजनेमध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला शेत रस्ता व पानंद रस्त्यासाठी35 कोटी74लक्ष रुपये किमतीच्या 144 किलोमीटर लांबीचे पानंद रस्त्यांना मंजुरी मिळाली असून त्यामधील अनेक कामे सुरू झाली आहेत यापुढेही आवश्यक त्या ठिकाणी आपण पानंद रस्ते मंजूर करून आणणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे यांनी खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या मातोश्री पानंद रस्ता योजनेमधून आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासाठी 144 किमी लांबीच्या रस्त्यांसाठी35 कोटी74लक्ष रुपये किंमतीच्या पानंद रस्ते मंजूर करून आणले आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून गावागावात रखडलेले पानंद व शेत रस्त्याचे प्रश्‍न मार्गी लागले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून शेतकरी वर्गाकडून आमदार बाळासाहेब आजबे यांचे आभार मानण्यात येत आहेत. यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून इतर विकास कामाबरोबरच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि दैनंदिन कामासाठी   महत्त्वाचा असणारा शेत रस्ता होणे गरजेचे आहे गावागावात शेत रस्ता व पानंद रस्त्यावरून नेहमीच भांडणे होत असतात हे कोठेतरी थांबले पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण प्रथम प्राधान्याने मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त पानंद रस्ते ना. संदीपान भुमरे, ना. धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे प्रयत्न करून हे रस्ते मंजूर करून घेतले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातील शेती व वस्ती रस्त्याचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागला आहे ,मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांना  गावांमधील पांदण रस्ते शेत रस्ते करणे आवश्यक आहे अशा शेतकऱ्यांनी आष्टी येथील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून नाव द्यावे असे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी बोलतांना केले आहे, आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे प्रयत्नमुळे मतदारसंघातील अनेक वर्षापासून रखडलेले शेत, पानंद, वस्ती रस्ते यामुळे मोकळे झाले असून यावर खडी मुरूम याने हे रस्ते पक्के करण्यात येणार आहेत गावागावातील वाद त्यामुळे मिटले असून प्रामुख्याने शेतकऱ्यांची सोय होणार आहे त्यामुळे गावागावात आमदार बाळासाहेब आजबे यांचे शेतकऱ्यांकडून आभार मानण्यात येत आहेत.


■ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नेहमीच शेतातील रस्त्यावरून एकमेकांशी संघर्ष करावा लागतो परंतु हा प्रश्न आता कायमचाच मिटणार असून आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात मातोश्री पानंद रस्ता योजनेतून जवळपास 144 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 35 कोटी 74 लक्ष रुपये मंजूर करून आ.बाळासाहेब आजबे काका यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

■ आष्टी मतदारसंघाची विकास दौड!

आष्टी मतदार संघाच्या आमदारकीची बाळासाहेब आजबे काका यांनी दोरा हातात घेतल्यापासून अनेक प्रश्नांना हात घालत गंभीर प्रश्न निकाली काढले आहेत. येणाऱ्या काळात आष्टी मतदारसंघात सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच वीज-पाणी-रस्ते कामासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही सुद्धा बाळासाहेब आजबे काका यांनी मतदारांना दिली आहे. त्यांच्या कामातून सध्या मतदारांना मोठा आधार मिळत आहे.

टिप्पण्या