आष्टी : शिव जागृती न्यूज
आष्टी तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीचे वर्षांपूर्वी बांधकाम झाले असून एक वर्षापूर्वी अग्निकुंड सांगाडा बसवण्यात आला होता. काही दिवसात उद्घाटन होणे बाकी होते परंतु नवीन अग्निकुंड सांगाडा शुक्रवारी दि.10 रोजी अज्ञात चोराने घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे याबाबत सरपंच राम धुमाळ यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्वराचे मोठे प्रमाण वाढले आहे कोण कशाची चोरी करेल याचा नेम राहिला नाही. जळगाव ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीतील अग्निकुंड चक्क चोराने चोरला आहे." इस चोर को क्या कहे! " अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या मशानभुमी साठी पाच लाख रुपये खर्चून काम पूर्णत्वास आले आहे.पन्नास हजार रुपय किमतीचा नवीन सांगाडा चोराने चोरल्याची घटना घडल्याने यासंदर्भात सरपंच राम धुमाळ यांनी पोलिसात तक्रार दिली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
■ ग्रामपंचायत कडून बक्षीस जाहीर!
जळगाव ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीचे काम पूर्णत्वाकडे आले असून नवीन अग्निकुंड सांगाडा बसवण्यात आला होता शुक्रवारी दिनांक 10 अज्ञात चोराने तो सांगाडा चोरून नेल्याची घटना घडली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार जो कोणी या अग्निकुंड याची माहिती देईल त्याचे नाव गुपित ठेवून 20 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
- राम धुमाळ
सरपंच जळगाव ग्रामपंचायत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा