■ शेतकऱ्यांकडून एका बियाण्याचे पैसे घेऊन दुसरच बियाणं दिल जात!
■ पेरणीच्या तोंडावर कृषी विभागाने शेतकऱ्याला पकडले खिंडीत!
पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यात कृषी विभागाकडून सोयाबीन गळीत धान्य व कापूस उत्पादनात वाढ व मूल्य साखळी विकास योजना प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प दरात देण्यात येणारे अभियान यात तफावत असल्याचे दिसून येत आहे. एका बियाणे चे पैसे घेऊन दुसरच बियाणे शेतकऱ्यांच्या हातावर ठेवण्याचा प्रकार उघड होत आहे.काही शेतकऱ्यांच्या तक्रारी सुद्धा आल्या आहेत. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून बियाणं बदलून दिले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. हा सावळा गोंधळ कृषी विभागाचा उघड झाला आहे.
बालाघाट ऍग्रो प्रॉडक्ट कंपनी लिमिटेड मार्फत सोयाबीन गळीत धान्य व कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प दरात मिळणाऱ्या बियाण्यात सावळा गोंधळ समोर येत आहे. एकाची नोंद करून रक्कम घेतली जाते व ऐन पेरणीच्या तोंडावर दुसरच बियाणं शेतकऱ्याच्या हातात ठेवल्याचं दिसून येत आहे.त्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागले आहेत.
■ नोंद दहा वर्षाआतील KDS726 वाणाची पण....
शेतकऱ्यांनी बालाघाट प्रोडक्ट कंपनी लिमिटेड मार्फत सोयाबीन देण्यात येणार दहा वर्षातील KDS726 या बियाण्याची नोंद करून त्याची रक्कम घेतली व देताना दुसरेच वाण दिल जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.यातून कृषी विभागाचा सावळा गोंधळ समोर येत आहे.
■ कृषी विभाग आहे की गोंधळ विभाग!
पाटोदा कृषी विभागातून शेतकऱ्यांना योग्य बियाणे योग्य दरात मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.परंतु शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मग शेतकऱ्यांकडून असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाटोदा कृषी विभाग आहे,की गोंधळ विभाग हेच कळेना झाले आहे.
■ अधिकाऱ्यांशी संपर्क केला पण...
शेतकऱ्याकडून तक्रारी आल्यानंतर विचारणा करण्यासाठी अधिकार्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु काहींनी फोन उचलला नाही.तर काही संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया घेण्यात आली नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा