पाटोदा : शिव जागृती न्यूज
एरवी शासकिय योजनांच्या अंमलबजावणी पध्दतीवरून जनमाणसात हमेशा नाराजीचा सूर उमटताना दिसतो. सरकारी काम आणि सहामहिने थांब अशी म्हणच समाजात प्रचलित झाली असून त्यामुळे शासकिय योजनाची प्रतिमा खराब होत असल्याचे दिसत असले तरी एका वेगळ्या अनुभवातून शासनाची खराब होत चाललेली प्रतिमा बदलण्याचे काम अध्यक्ष वृध्द कलावंताच्यादारी या उपक्रमामधून पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून गरजू कलावंताच्या दारी जावून त्यांच्या परिस्थीतीची प्रत्यक्ष पाहणी करून तो कलावंताच्या मानधनास पात्र आहे किंवा नाही याची शहनिशा करण्याच्या सुचना कलावंत निवड समिती अध्यक्षांना दिल्यावरून हभप मुरकूटे महाराज यांनी दि.1 जुन रोजी थेरला येथे येवून प्रत्यक्ष भेट दिली.
वृध्द कलावंत व साहित्यिक निवड समितीचे शासकीय अध्यक्ष श्री नागनाथ मुरकुटे महाराज यांना काल रात्री पाटोदा तालुक्यातील थेरला गावातून जेष्ठ गायक श्री भिमराव राख यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क करून आपल्या गावातील गरजु व गुणी कलावंत सदाशिव पांडुरंग आगलावे यांच्या परिस्थीतीबध्दल सर्व हकीकत कथन करून अडगळीत पडलेल्या कलावंताला शासनाचे मानधन मिळवून देण्याच्या आवश्यकतेविषयी विनंती करताच अध्यक्ष श्री मुरकूटे महाराज यांनी शासनाच्या योजना अशा कलावंतासाठीच आहेत आणि मला ही शासनाने अशा लोकांना न्याय देण्यासाठीच नेमलेले आहे अशी चर्चा करीत गरजु कलावंताची भेट घेण्याच्या इच्छेने सकाळी 6 वाजता स्वतःच्या गाडीने अंबाजोगाई येथून प्रवास करून सकाळी 9.00 वाजता थेरला गावातील गरजु व गुणी कलावंत श्री आगलावे यांची भेट घेवून त्यांन धीर देत त्यांच्या सर्व परिस्थीती विषयी व कलावंताच्या सततच्या फरफटी विषयी माहिती घेतली तसेच थेरला येथील ग्रामसेवक श्री विठ्ठल राख साहेब, जिल्हा न्यायालयाचे अॅड. प्रशांत दगडखैर, ग्रामस्थ चंदु दुधाळ, यांनी श्री आगलावे यांचे गावातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदाना विषयी माहिती देत त्यांच्या शासकिय मानधन विळविण्याच्या गरजे विषयी विनंती करताच अध्यक्ष श्री मुरकूटे यांनी इथपर्यंत येवूनच माझे काम संपलेले नाही तर, खऱ्या कलावंताच्या शोधासाठी अध्यक्ष वृध्द कलावंताच्या दारी हे अभियानच आपल्या थेरला गावापासून सुरु करीत आहोत. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी श्री सोळंके साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिंदे साहेब समाज कल्याण अधिकारी, श्री भिकाने साहेब व गाडे साहेब यांचे विषेश सहकार्य लाभत आहे असे सांगून आपण आपली काळजी घ्या असे म्हणत कलावंत सदाशिव आगलावे यांना तातडीने शासनाचे मानधन मिळवून देण्याचा शब्द दिला आणि त्वरीत त्यांचा प्रस्ताव तयार करून निवड समितीसमोर मांडण्यांच्या सुचना पांडुरंग राख यांना दिल्या.
चांगले काम करण्याची भावना असणारी माणसे जर सत्तेत असतील तर काय होऊ शकते मदत कारणरे हात थेट गरजु पर्यंत पोहचवू शकतात याचा एक चांगला वस्तुपाठच या निमीत्ताने सर्व लोकांना अनुभवायला मिळाला. ही एक चांगली गोष्ट घडल्याबध्दल ग्रामस्थांनी अध्यक्ष मुरकूटे महाराज यांचे आभार मानले.
यावेळी गावातील व थेरला परिसरातील गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, साहित्यीक तसेच सरपंच गायकवाड, उपसरपंच गणेश राख, जेष्ठ गायक भिमराव राख, आप्पासाहेब राख, गटविकास अधिकारी श्री राख साहेब, भजनी मंडळातील सदस्य तसेच शिक्षक, ग्रामस्थ आणि महिला यांची आवर्जून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार पांडुरंग राख यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा