" शिवस्वराज्य दिन " निमित्त पत्रकारांची कुसळंब येथे महत्त्वाची बैठक संपन्न!


 

पत्रकारांच्या संरक्षण व न्याय हक्कासाठी चिंतन बैठक!

कुसळंब : शिव जागृती न्यूज


पाटोदा तालुक्यातील पत्रकारांची महत्वाची बैठक शिवस्वराज्य दिनानिमित्त कुसळंब येथे संपन्न झाली. यावेळी पत्रकारांवर होत असलेले वारंवार हल्ले, मिळत नसलेला सन्मान, तुरळक पत्रकारांमध्ये होत असलेली बदनामी यावर महत्त्वाची चिंतन बैठक घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय झाला.यावेळी अनेक विषयावर चर्चा करत येणाऱ्या काळात पत्रकारांना सन्मानाने वागणूक मिळेल,हल्ले होणार नाहीत, याची सुद्धा खबरदारी घेऊन त्यानुसार पुढचे पाऊल उचलण्यात येईल असे देखील बैठकीत ठरवण्यात आले.

मागील काही महिन्यापासून पाटोदा तालुक्यातील तीन पत्रकारांवर हल्ले झाले आहेत,त्यातील अशोक भवर,संजय सानप, व जावेद शेख या तीन पत्रकारांवर हल्ले होऊन कसलीच कारवाई न झाल्यामुळे आणि त्यांना पत्रकारांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. यापुढे पत्रकारांना स्वाभिमानी वागणूक मिळवण्यासाठी आणि पत्रकार काय असतो हे दाखवून देण्यासाठी त्याच्या लेखणीची ताकद काय आहे,हे सिद्ध करण्यासाठी 

" शिवस्वराज्य दिनाच्या " निमित्ताने पाटोदा तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रित येऊन महत्वाची बैठक घेतली. 

त्यावर सविस्तर माहिती आपल्याला लवकरच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दिली जाईल असे देखील त्यांनी सांगत थोडा संयम ठेवला आहे. कारण की मोठा निर्णय घ्यायचा म्हटलं की संयम ठेवावाच लागतो.लवकरच पत्रकारांचा महत्त्वाचा निर्णय वर्तमानपत्राच्या माध्यमातून बाहेर येईल असे देखील बैठकीत सांगण्यात आले. बैठकीतील काही गुपित मुद्दे सुद्धा गुपितच ठेवले असून ते सुद्धा वर्तमानपत्राच्या माध्यमातून लवकरच आपल्या समोर येतील असे सांगण्यात आले आहे. ही बैठक अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी पत्रकार संजय सानप,सोमनाथ खंडागळे सर,प्रा.सचिन पवार,हमीदखान पठाण, प्रा. बबन पवार सर,सचिन गायकवाड,अशोक भवर,बिभीषण चाटे,जावेद शेख,दत्ता देशमाने,नानासाहेब डिडुळ,अजय जोशी,दयानंद सोनवणे, श्रीरंग लांडगे, हरिदास शेलार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.


■" शिवस्वराज्य दिन " यापुढे पाटोद्यातील पत्रकारांचा महत्त्वाचा दिन! 


पाटोदा तालुक्यातील पत्रकारांना नेहमीच कमी लेखलं जात आहे.त्यांच्या लेखणीला महत्त्व मिळत नसल्याने चांगल्या पत्रकारांच खच्चीकरण देखील होत आहे. म्हणूनच शिवस्वराज्य दिनानिमित्त पत्रकारांची महत्वाची बैठक कुसळंब येथे संपन्न झाली. यावेळी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालत येणाऱ्या काळात पाटोदा तालुक्यातील पत्रकारांची वेगळीच ओळख निर्माण करू असा निर्णय घेऊन सन्मानाने वागणूक मिळेल यासाठी नवीन संकल्पना राबवण्याचा निर्णय पत्रकारांनी काल घेतला आहे.


बैठकीला 30 पत्रकारांचा पाठिंबा!


कुसळंब येथे शिवस्वराज्य दिनानिमित्त पार पडलेल्या पत्रकारांच्या बैठकीला स्वाक्षरीचे रूपाने जवळपास 30 पत्रकारांनी पाठिंबा दर्शवला असून पुढील पत्रकारितेचे काम एकत्रित काम करण्यासाठी स्वाक्षरी दिल्या असून लवकरच महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे.

टिप्पण्या